मोबदला दिल्या शिवाय शेतक-यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही:किशोर जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जून २०१९

मोबदला दिल्या शिवाय शेतक-यांच्या जमिनीला हात लावू देणार नाही:किशोर जोरगेवार

एमआयडीसिने अधिग्रहित जागेवर झाडे लावण्यासाठी                   खोदलेले खड्डे बुजवत कुंपण तोडले   
चंद्रपुर/प्रतिनिधी:

                    कोणत्यही प्रकारचा मोबदला न देता एम.आय.डी.सी. नी येरुर येथील शेतक-यांच्या जमिनी उद्योगासाठी हस्तांतर केल्या आहे. आजवर या जमीनीवर शेतक-यांचा ताब्यात होत्या. 

मात्र आता एमआयडीसीने येथे तारेचे कुंपण घालून तेथे झाडे लावण्याचा कट रचला याची माहीती यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी जोरगेवार यांनी शेतक-यांच्या अधिग्रहीत जागेवर झाडे लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे बुझवत एमआयडीसीने लावलेले कुंपण तोडले. पहिले मोबदला दया नंतरच गावक-यांच्या जमीनचा ताबा घ्या 


अशी आक्रमक भुमीका जोरगेवारांनी घेतली आहे. यावेळी कलाकार मल्लारप, सरपंच मनोज आमटे, दिनेश बोढाले, उपसरपंच रमेश बुचे, गजानन पारखी, सुरेश धोरडे, नारायण पोतराजे, संदीप कष्टी, विनोद अनंतवार, राशीद हुसैन, इमरान खान, विलास सोमलवार* यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची उपस्थिती होती