राष्ट्रीय महामार्ग व खडगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

राष्ट्रीय महामार्ग व खडगाव मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा

महाराष्ट्र वाहतूक सेनेचे नगराध्यक्ष व
 सरपंच यांना निवेदन निवेदन 
नागपूर/अरुण कराळे:

वाडी येथील दत्तवाडी ,काटोल बायपास मार्ग , राष्ट्रीय महामार्गावरील कैलाश पेट्रोल पंप ते एमआयडीसी टी पॉइंट पर्यत रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत.

 या खड्डयामुळे दुचाकी वाहन चालकांचे अपघात सुध्दा झाले आहे .वाडी नगर परिषदमधील संबंधित विभागांनी या कडे लक्ष देऊन खड्डयाचा निपटारा करावा अन्यथा महाराष्ट्र वाहतूक सेना द्वारा आंदोलन करण्याचा इशारा वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी राजेश भगत , नगराध्यक्ष प्रेम झाडे , उपनगराध्यक्ष राजेश थोराने यांना निवेदनातुन दिले आहे . राष्ट्रीय महामार्गावरून कळमेश्वर कडे जाणारा खडगाव मार्ग ,सोनबा नगर व लाव्हाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे त्यामुळे याही मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे . 

खडगाव मार्गावरील खड्डे बुजविण्याचे निवेदन लाव्हा ग्रामपंचायतचे सरपंच ज्योत्सना नितनवरे यांना दिले . यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हा कार्यध्यक्ष भाऊराव रेवतकर,सचिव अखिलेश सिंह, जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल,उपतालुका प्रमुख धनराज लांडगे,वाड़ी शहर प्रमुख अभय वर्मा,लाव्हा उपशहर प्रमुख बालकिशन सोनी प्रामुख्याने उपस्थित होते .