राष्ट्रीय महामार्गावर अडवून भरतोय चिमुरात बाजार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जून २०१९

राष्ट्रीय महामार्गावर अडवून भरतोय चिमुरात बाजार

ट्राफिकमुळे सामान्य नागरिकांच्या निघतो अंगाचा घाम

चिमूर:- रोहित रामटेके:चिमूर येथून जात असलेला चिमूर-वरोरा ३५३ ई हा राष्ट्रीय महामार्ग असून हा महामार्ग प्रत्येक शुक्रवारला अडवून आठवडी बाजार भरवला जातो हे अनेक वर्षांपासून चिमुरातील प्रथाच झाली आहे. 


पण याच प्रथेचा चिमुरातील वाहतुकीवर खूप मोठा परिणाम पडत आहे. दिवसेंदिवस वाढतच चालणाऱ्या वाहनांमुळे हि वाहतुकीची गर्दी अतीच प्रमाणात वाढत आहे. पण याकडे नगर परिषदचे दुर्लक्ष होत जात आहे. राष्टीय महामार्गाचे काम चिमूर तहसील कार्यालयाच्या समोर चालू असल्याने चिमुर येथील वाहतूक हि आज शुक्रवारला साधारणतः १ तास वाहतुकीची कोंडी झाली. या वाहतुकीच्या कोंडीला समोर जाता जाता सामान्य नागरिकांना आपल्या अंगाचा घाम काढावा लागला. तहसील कार्यालयाच्या समोर रस्त्याचे खोदकाम हे मागील आठवड्या पासून रस्ता खोदून ठेवला आहे पण त्या कामाला अजून पर्यंत सुरवात झाली नाही व आज पुन्हा या एका बाजूच्या रोड ने ये जा करीत असताना वाहतूक कोंडी होतेच.


 या कोंडी मध्ये जर एखादी रुग्णवाहिका आली तर त्या रुग्णवाहिकेला रस्ता कुठून मिळेल हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे व चिमूर येथे  तीन तीन वाहतूक पोलीस कार्यरत असताना सुद्धा अश्या प्रकारची वाहतूक कोंढी निर्माण होत आहे. हि आश्चर्याची बाब दिसत आहे.