कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ जून २०१९

कारंजात शॉर्टसर्किट ने लागली दोन घराला आग

कारंजा(घा)उमेश तिवारी:

वेळीच लक्षात आल्याने मोठी घटना टळली

 आर्वी विधानसभेचे आमदार अमर काळे व कारंजा नगरपंचायतचे उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर, नगरसेवक नरेश चाफले घटनास्थळी मदतीला आले धावून. 

 - कारंजा येथील दोन घरांना अचानक शॉट सर्किटने आग लागल्याने घराचे साहित्य जळाले. वेळीच आग लागल्याच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.शेषराव आमझिरे व बंडू आमझिरे यां दोघांच्या घराला संध्याकाळच्या सुमारास आग लागली.

या वेळी घरातील सर्व सदस्य हजर होते.आगीत घरातील कपडे , जीवनावश्यक साहित्यसह घरातील काही सामान जळाले.परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विजवली.