अस्वलीच्या हल्यात शेतकरी जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जून २०१९

अस्वलीच्या हल्यात शेतकरी जखमी

 लाखांदूर/प्रतिनिधी:
 तालुक्यातील कनाळगाव येथील एका शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केला असून यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज कन्हाळगाव येथे शेतशिवारात आज दिनांक 21 फेब्रुवारीला सकाळी ९  वाजता दरम्यान घडली.

हिरालाल मुरलीधर बगमारे वय ४९ वर्ष राहणार कनाळगाव असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सदर शेतकरी सकाळी करून स्वतःच्या मालकीच्या शेतात धान लागवडीचे काम कर करण्यासाठी गेला होता दरम्यान शेतात काम करीत असताना अचानक दबा धरून असलेल्या अस्वलाने  अचानक शेतकऱ्यावर हल्ला केला व गंभीर जखमी केले शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेतली व अस्वल च्या तावडीतून सुटका करण्यात आली.

सदरशेतकऱ्याला तात्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या विभागाने पंचनामा केला असून कुटुंबीयांनी आर्थिक  मदतीची मागणी केली आहे सध्या या शेतकऱ्या वर उपचार सुरू आहेदरम्यान तालुक्यात अनेक गावात वाघ ,अस्वल ,डुक्कर ,व अन्य जंगली प्राण्यांची धुमाकूळ घातला असून कधी माणसावर तर कधी पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहेत वन विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे