महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तीन म्हशींचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ जून २०१९

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे तीन म्हशींचा मृत्यू

चंद्रपुर/प्रतिनिधी:


दिवसभर खुल्या मैदानात चरून झाल्यावर सायंकाळ होताच घरी येत असताना महावितरणच्या LT लाईनचा करंट लागून तीन म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस पडली मार्गावरील खुटाळा गावाजवळ घडली.

सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याकारणाने ओलावा जमिनीला धरून असतो अशातच महावितरणच्या LT लाईन चा एक लाईव्ह कंडक्टर जमिनीवर पडला होता त्याच ठिकाणाहून तीन म्हशी जात असताना त्या विजेचा जबर धक्का बसला व त्यांचा जागीच मृत्यू झाला,त्यामुळे महावितरणची ही लापरवाही आता शेतकऱ्यावर भुरदंडित बसल्यामुळे तिन्ही म्हशीची नुकसान भरपाई महावितरणकडून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती घेण्यासाठी महावितरणशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.