रुग्णालयातील जेवणात आढळलं शेण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जून २०१९

रुग्णालयातील जेवणात आढळलं शेण


नागपूर- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दिल्या जाणाऱ्या जेवणात शेण आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन हॉस्पिटल प्रशासनानं दिलं आहे.

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये चंद्रपूर येथील उमेश पवार नामक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून अॅडमिट आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलद्वारे दिल्या जाणाऱ्या जेवणात शेण आढळ्याचा आरोप उमेश पवार यांच्या पत्नीनं केला आहे.

दरम्यान, उमेश पवार यांच्या पत्नीनं हॉस्पिटल प्रशासनाला या संदर्भात कळवले, त्यावेळी जेवणात आढळून आलेला घटक पासणीसाठी पाठवण्यात आला. इतकेच नव्हे तर, या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन हॉस्पिटल प्रशासनानं दिलं आहे.