रविवारी तेली समाजाची सर्वपक्षीय सभेचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

रविवारी तेली समाजाची सर्वपक्षीय सभेचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
तेली साठी इमेज परिणाम
चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तेली समाजातील विविध संघटनांचे अध्यक्ष तथा सर्व पदाधिकारी तसेच समाजीक व राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते आपणा सर्वांची सहविचार सभा मातोश्री  सभागृह तुकूम चंद्रपूर येथे रविवार दिनांक १‍६.६.२०१९ ला  दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

सभेला मा.खासदार रामदासजी तडस साहेब मा.श्रीमती संध्याताई सव्वालाखे मा.बाबुरावजी कोहळे मा.अतुलजी वांदिले मा.देवरावजी भांडेकर मा. शेखरजी शेंडे  मा. रघुनाथजी शेंडे मा.डॉ. वासुदेव गाडेगोने साहेब डॉ. विश्वास झाडे साहेब मा.श्रीमती शोभाताई पोटदुखे मा. बबनरावजी फंड  यांना मार्गदर्शना करिता आमंत्रित करण्यात आले आहे .

 करिता आपण समस्त तेली समाज बांधव, महिला,युवक यांनी सभेला अवश्य उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.सर्व समाज बांधवांना या सभेची माहिती कळवावी, ही विनंती .

आयोजक :- 
सूर्यकांत खनके,गंगाधर कुंनघाडकर,सौ.छबुताई वैरागडे,सौ.मीनाक्षीताई गुजरकर,जितेंद्र ईटनकर