विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जोरगेवार आले धावून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जून २०१९

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जोरगेवार आले धावून

    300 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यंग चांदा ब्रिगेड   चंद्रपुर/प्रतिनिधी:       
                             
  विपरित परिस्थितीत अथक परिश्रम करुन चंद्रपूरचा विद्यार्थी शैक्षणीक क्षेत्रात जिल्ह्याचे नाव लौकीक करत आहे.

 या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी यंग चांदा ब्रिगेड सदैव राहणार असून शहरातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको ही आमची भूमीका आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला जर महाविद्यालयात प्रवेश मिळत नसेल तर त्यांनी खचून न जाता मला हाक द्यावी असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांना केले. काल रविवारी जैन भवन येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

 या कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची अध्यक्ष स्थानी तर धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते यांची उद्घाटक म्हणून उपस्थिती होती, पांडुरंगजी आंबटकर संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जैस्वाल, सुनील पाटील, भारती दुधानी, अश्विनी खोब्रागडे, कलाकार मल्लारप, आदिवासी नेते दयालाल कन्नाके, वंदना हातगावकर, नेत्रा इंगुलवार, सायली येरणे, संतोषी चव्हाण, विजया बच्छाव सुजाता बल्ली, दुर्गा वैरागडे, रजनि चिंचोळकर, विनोद अनंतवार, रुपेश पांडे, निलेश बेलखेडे, हर्षद कानमपल्लीवार, राशीद हुसैन, मंगेश अहिरकर, मुन्ना जोगी, दीक्षांत बेले, नंदाताई पंधरे, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, भाग्यश्री, राहुल पाल, कैलास धायगुडे, तिरुपती करंगल, सौरभ ठोंबरे, पंकज चिमूरकर, प्रशांत रोहणकर* यांची उपस्थिती होती.