चिमुकलीचा बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०१९

चिमुकलीचा बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या

चंद्रपूर जिल्ह्यातील चर्मकार संघटनांची संयुक्त मागणी
चंद्रपूर/प्रतिनिधी:

मौजा देवरी जिल्हा गोंदिया येथे अश्विन विठ्ठल मेश्राम वय 29 वर्ष या नराधमाने दि. 01/06/2019 ला शेजारी पहुनी म्हणून आलेल्या 5 वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेट चा बहाणा करुन तिला जवळ बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व चर्मकार बांधवांमध्ये तिव्र पडसाद उमटला व दि 15/06/2019 ला त्या अनुषंगाने नराधमाला फाशीची शिक्षा मिळालीच पाहीजे या मागनीसह गिरनार चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मुक मोर्चा काढण्यात आला.

या मोर्च्याला चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त चर्मकार बांधव व इतर मित्रपरिवार उपस्थित होते. *या निषेध मोर्चायाचे नेतृव गुरु रविदास फाउंडेशन चंद्रपुर व संत शिरोमणी रविदास महाराज बहु. सेवा समिती उर्जानगर,दुर्गापुर.यांच्या नेतृत्वार करण्यात आले.* जिल्हाधिकारी कार्यालया जवळ मोर्चा आल्यावर मोर्चा चे संयोजक 1) संत शिरोमणी रविदास महाराज बहु. सेवा समिती उर्जानगर,दुर्गापुर.

2) गुरु रविदास फाउंडेशन,चंद्रपूर.

3) राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा कमेटी.

4) विरसैया कंकय्या चर्मकार विकास संस्था मर्या. विदर्भ प्रदेश चंद्रपूर.

5) संत रविदास बहु.सेवा मंडळ विसापूर.

6) संत रविदास बहु. मंडळ गडचांदुर.

7) संत रविदास महाराज युवा मंच बाबुपेठ,चंद्रपूर.

8) संत रविदास महाराज पंच मंडळ पंचशील वार्ड,चंद्रपूर.

9) संत रविदास महाराज युवा मंच अंचलेश्व्र गेट,चंद्रपूर.

10) संत रविदास महाराज मंडळ बल्लारशाह.

व सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील चर्मकार संघटनेचे पदाधिकारी यानी संयुक्त रित्या मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या मार्फत मा. राज्यपाल महारास्ट्र शासन याना निवेदन दिले व मोर्च्याची सांगता राष्ट्रगीत ने करुन या घटनेचा पुन्हा एकदा जाहिर निषेध करण्यात आला व या घटनेचा शासनाने गंभीर पणे विचार न केल्यास पुन्हा तिव्रपने शासन मार्गाने अंदोलन करण्याचा गरभित इशारा देण्यात आला.