नवरगाव उपवनपरीक्षेत्र कार्यालयावर सरपनासाठी महीलांचा एल्गार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जून २०१९

नवरगाव उपवनपरीक्षेत्र कार्यालयावर सरपनासाठी महीलांचा एल्गार

सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचा दणका
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी गौंड यांचे महिलांनी मानले आभार
(प्रशांत गेडाम)सिंदेवाही : 
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे महीलांना जळावु लाकुड मिळत नसल्याने. नवरगाव येथिल सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेने दखल घेत उप वनपरीक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.   
कमी दरात जाळावु लाकुड उपलब्ध करुन द्यावे , ही मागणी प्रामुख्याने सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचे प्रमुख अमोल निनावे यांनी केली. सिंदेवाही वनपरीक्षेत्र अधिकारी गौंड साहेब यांनी साठ रुपयात मिळनारा जळावु लाकुड आता चाळीस रुपयाने देनार व हप्त्यातुन दोन दिवस उपलब्ध करुन देण्याची हमी दिली .यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. महीलांना सरपनासाठी जळावु लाकुड स्वस्त दरात मिळत असल्याने वनपीक्षेत्र अधिकारी गोंड यांचे मोर्चेकरी महीलानी  आभार मानले. 

मोर्चा माता चौक ते वनपरीक्षेत्र कार्यालय असा निघाला.  उन्हातही महीला मोर्चात सहभागी झाल्या होत्या हे विषेश.मोर्चात श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, सामाजिक युवा ब्रिगेड संघटनेचे प्रमुख अशोक निमगडे, शांताराम आदे, वंदना मांदाडे, पुष्पा कामडी, शुभम येरमे, जय तगलपल्लीवार, यासह शेकडो महीला सहभागी होते.