नगराध्यक्षांनी घेतली महीलांच्या पाणी टाकीवरील विरूगिरीची दखल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ जून २०१९

नगराध्यक्षांनी घेतली महीलांच्या पाणी टाकीवरील विरूगिरीची दखल

नियोजनबद्ध पाणी वितरण करण्याची मजीप्राची जबाबदारी - नगराध्यक्ष  प्रेम झाडे 
मजिप्रा व नगरपरिषदच्या अधिकाऱ्यात 
तु तु मै मै
महीला व अधिकाऱ्यांची खडाजंगी 
(खबरबातचा दणका )
नागपूर / अरूण कराळे :जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे की, तो कठीण रोल नेहमी बेस्ट अॅक्टरलाच देत असतो . अशाच अवघड समस्येला वाडीतील नागरीक दोन महीन्यापासून तोंड देत आहे . 

याकरीता प्रत्येक वार्डातील नागरीक भिषण पाणी टंचाईवर मात करीत असून जन्मापासून मृत्यूपर्यत सोबत करतं पाणी , जीवनाच्या काठावर शेवटचं आचमन असतं पाणी . अर्थात पाणी हेच जीवन आहे मात्र जेव्हा केव्हा हे पाणी मिळत नाही तेव्हा लोकांना मरणयातना भोगाव्या लागतात .

वाडीत पाण्यासाठी महीला चढल्या टाकीवर ही बातमी सोमवार २४ जुन रोजी खबरबात मध्ये प्रकाशीत होताच इतरही वार्डातील महीला आक्रमक होऊन वाडी नगर परिषद वर धावून गेल्या . तिथे मात्र मजीप्रा व वाडी नगर परिषद मधील अधिकाऱ्यांची तू तू मै मै सुरू झाली .स्थानिक नगरपरिषद प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावाने संपुर्ण शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणी समस्या सोडविण्यासाठी सोमवारी नगर परिषदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी कार्यालयात प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला. 

शहरातील पाणी समस्यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी मजिप्र अधिकाऱ्यासोबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी स्थानिक मोठ्या संख्येनी हजर राहून नगर परिषद व मजीप्रा यांच्या ढिसाळ कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या . विविध वॉर्डातील महिलानी पाणी सुरळीत व नियमितपणे वितरित करण्यासाठी पाण्याच्या टाकीला घेराव घातला असतानाही मजीप्राचे अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्याने शेवटी नगराध्यक्ष प्रेम झाडे घटनास्थळावर जाऊन संतप्त महिला व नागरिकांशी चर्चा करून शांत केले व या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सोमवारी मजिप्रा अधिकाऱ्यांना चर्चेसाठी नगरपरिषदेमध्ये येण्याच्या सूचना दिल्या.

 त्यानुसार मजीप्राचे वरिष्ठ अभियंता नरेश शनिवारे, शाखा अभियंता सुनील भांडारकर, शाखा अभियंता अविनाश पालथे उपस्थित झाले.नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी पाणी वितरणात मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्यामूळे नागरिकाना भीषण पाणी टंचाईचा नाहक सामना करावा लागतो असे मत व्यक्त केले.

सभेत वाडी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या धम्मकीर्तीनगर, सत्यसाई सोसायटी , इंद्रायणी सोसायटी , श्रीकृष्णनगर ,गुरुप्रसादनगर,आंबेडकर नगर,त्रिलोक नगर येथील समस्याग्रस्त नागरिकानी नगर परिषद व मजीप्रा अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पाणी वितरण वेळापत्रकानुसार न करणे अशुद्ध पाण्याचा पुरवठा,वॉल सोडणाऱ्या कर्मचाऱ्याची लहरींपणा,पाणी वाटपात दुट्टपीपणा आदी आरोप करीत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

यावेळी सभेला उपस्थित नगरसेवक नरेंद्र मेंढे,आशिष नंदागवळी, राजेंद्र पाटील, अॅड .श्रीराम बाटवे,अभय कुनावार, अभिजीत जोशी , प्रमिला पवार,शारदा ठाकरे,कला खंडारे,ममता साखरकर,छाया वानखेडे ,वैशाली पोहनकर,भाग्यश्री काळे,इंदू चौबे,सुमन बोकडे आदींसह मोठया संख्येनी स्थानिक महिला-पुरुष उपस्थित होत्या.सभेतील तापते वातावरण बघता संयुक्त बैठकेतील निर्णयानुसार पाण्याच्या टँकवर दोन दिवसांत पाणी वितरण वेळापत्रक नकाशा लावणे,दिवसात पंप ऑपरेटरची बदली,पोलिस कर्मचारी पूर्णवेळ तैनात, पाणी वितरण कार्यात कोणत्याही नगरसेवकाचा हस्तक्षेप राहणार नाही यदाकदाचित असे निदर्शनास आल्यास नगरसेवक व नागरिकांवर योग्य पोलीस कार्यवाही करण्यात येईल,तसेच मजिप्रच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर संबंधित विभाग कार्यवाही,गुरुप्रसाद नगराच्या विहिरीत टाकले जाणारे अतिरिक्त टँकरचे पाणी घरोघरी वितरित केल्या जाईल या विहिरीतील जुना झालेला पाणी पंम्प मोटर बदलवून नवीन लावणे आदींसह अनेक निर्णय घेण्यात आले.