काटोल विभागात कृषी पंपाच्या वीज जोडणीचे कामे प्रगतीपथावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जून २०१९

काटोल विभागात कृषी पंपाच्या वीज जोडणीचे कामे प्रगतीपथावर

नागपूर/प्रतिनिधी:

काटोल विभागात शेतकऱ्यांना कृषी पंपाची जोडणी लवकर मिळावी यासाठी महावितरणकडून पुढाकार घेण्यात आला असून आतापर्यंत येथील २६७ शेतकऱ्यांना शेती पंपासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली मार्फत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

महावितरणच्या काटोल विभागात कळमेश्वर, काटोल, नरखेड या तालुक्यांचा समावेश होतो. येथे शेती पंपासाठी ९४२ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले होते. कंत्रादारामार्फत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी कार्यादेश जारी  करण्यात आले आहेत. 

नरखेड उपविभागात७९ काटोल उपविभागात ३३, जलालखेडा उपविभागात६३, कोंढाळी  उपविभागात ५२, सावरगाव उपविभागात ४० शेतकऱ्यांना आतापर्यंत शेतीपंपासाठी वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार आणि खात्रीशीर वीज पुरवठा मिळावा यासाठी २७६ नवीन रोहित्रांची उभारणी या भागात करण्यात आली आहे. 

उर्वरित शेतीपंपांना या वर्ष अखेरपर्यंत जोडणी देण्याचे नियोजन महावितरणकडून करण्यात आले आहे