बुधवारी नागपूरचा या ठिकाणचा वीजपुरवठा राहणार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ जून २०१९

बुधवारी नागपूरचा या ठिकाणचा वीजपुरवठा राहणार बंद

नागपूर/प्रतिनिधी:

देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक २६ जून रोजी त्रिमूर्तीनगर, जयताळा,जयप्रकाशनगर येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी ८ ते ११ या वेळेत जयप्रकाशनगर,गांगुली ले आऊट, राजीव नगर,राहुल नगर, त्रिमूर्तीनगर, भेंडे ले आऊट, पन्नासे ले आऊट, मनीष ले आऊट, पाटील ले आऊट,स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थ नगर,जयबद्रीनाथ, तलमले ले आऊट, भांगे विहार, शहाणे ले आऊट, सुर्वे नगर,गावंडे ले आऊट, टेलिकॉम नगर, शंकर नगर, रवींद्र नगर, कार्पोरेशन कॉलनी, बालजगत परिसर,लक्ष्मी नगर,नीरी परिसर, येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ७. ३० ते १०. ३० या वेळेत शेंगाव नगर,शिर्डी नगर, जयहिंद सोसायटी, नरसाळा, बहादुरा, बाबा ताज नगर,मिलन नगर, दिनदयालनगर,स्वावलंबी नगर,पडोळे कॉर्नर, लोकसेवा नगर,भामटी ,कापसे ले आऊट, राजापेठ, हुडकेश्ववर, विठ्ठलवाडी येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ७ ते ११ या वेळेत नवजीवन कॉलनी, प्रगती कॉलनी, छत्रपती नगर,सहकार नगर, प्रशांत नगर,हिंदुस्थान कॉलनी, राहुल नगर, वाडी, दत्तवाडी, सत्यसाई सोसायटी, शिवशक्ती नगर,वेणा नगर,आंबेडकर नगर, अंबाझरीचा काही भाग, गिरीपेठ,गोकुळपेठ, धरमपेठ येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ७. ३० ते ११ या वेळेत एकात्मता नगर,पूजा ले आऊट, दादाजी नगर, कबीर नगर, जनहित सोसायटी, शिवणगाव, भोसले नगर, पंचशील नगर,बिट्टू नगर,सकाळी ८ ते ९ या वेळेत रामदासपेठ परिसर, सकाळची ८ ते १० या वेळात कुंबर्टोली, जोशीवाडी, नागजीभाई टाऊन येथील वीज पुरवठा बंद राहील.