चंद्रपुर;बेपत्ता झालेली दोन मुले स्वगृही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जून २०१९

चंद्रपुर;बेपत्ता झालेली दोन मुले स्वगृही

चंद्रपूर पोलिसांच्या शोधमोहिमेला यश
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर पोलीस साठी इमेज परिणाम
 राजुरा तालुक्‍यातील गोवरी आणि वरोरा येथून बेपत्ता झालेली दोन अल्पवयीन मुले अखेर स्वगृही परतली आहे. गेल्याचार महिन्यांपासून ही मुले बेपत्ताहोती. बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होताच मुलांच्या शोधासाठी स्वतंत्र पथक गठित करण्यात आले होते.या पथकाला मुलांचा शोध घेण्यात यश आले. एकाला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून तर,दुसरा मुलगा दिल्ली येथे पोलीसपथकाला सापडून आला.राजुरा तालुक्‍यातील गोवरी येथील विलास देवाजी इटनकरयांचा चौदा वर्षांचा मुलगा ३फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता.

त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रारदिली होती. तक्रारीच्या आधारे अपहरणाची गुन्हा नोंद करून मुलाची शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, बेपत्ता मुलगासोलापूर जिल्ह्यातील अकलूज
येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोलापूर पोलिसांच्या मदतीने मुलाला ताब्यात घेतले.वरोरा येथून बेपत्ता झालेला बाबाराव रामटेके यांचा मुलगा दिल्ली येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने दिल्ली गाठून
त्यालाही ताब्यात घेतले. दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड़ी यांच्या मार्गदर्शनातसायबर सेलचे पथक आणि राजुराव वरोरा पोलिसांनी ही मोहीम राबवून मुलांचा शोध घेतला.