ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी बस पासेसची गती वाढवा:जोरगेवार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एसटी बस पासेसची गती वाढवा:जोरगेवार

चंद्रपूर/प्रतिनिधी:

राज्य परिवहन मंडळ, चंद्रपुर च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीमध्ये व सुकर प्रवास व्हावा याकरिता पास देण्यात येत आहे. मात्र पास वाटप करण्याची गती अतीशय मंद असल्याने पासेस साठी चंद्रपूर येथील बस स्थानकावर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना भर उन्हात ताटकळत राहावे लागत आहे. त्यामूळे पासेस वाटपाची गती वाढवावी तसेच पासेस साठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तात्पूरत्या स्वरुपाचा शेड उभारावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी केली आहे तसे निवेदन राज्य परिवहन मंडळाच्या मूख्य व्यवसस्थाकाला देण्यात आले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याचे तापमानाने उष्णतेचा कहर केला आहे. अश्यातच ज्येष्ठ नागरिकांना या प्रचंड तापमानात पास देण्याकरिता बोलावत तासन तास ताटकळत ठेवल्या जात आहे. एका दिवशी फक्त वीस पास वितरीत करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे राज्य परिवहन मंडळ, चंद्रपुर च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना पास देण्याआधी त्या ठिकाणी योग्य रित्या व्यवस्था करणे अपेक्षीत होते. मात्र पास वाटप करण्यात येत असलेल्या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील संपूर्ण ज्येष्ठ नागरिकांना एकाच ठिकाणी पास देण्याकरिता न बोलावता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पास वाटप करण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच पासेस वाटप करण्याची गती वाढवावी अशी मागणी जोरगेवार यांनी केली असून या संदर्भात त्यांनी महामंडळच्या अधिका-यांशी चर्चा केली आहे. यावेळी अधिका-यांनी ही सकारात्मक चर्चा करत प्रत्येक तालुक्याची ठिकाणी पास वाटप संदर्भात व्यवस्था करण्याचे आश्वासण दिले आहे.