सिंदेवाही नगरपंचायतीवर महीलांचे पाणी,रोड,नालीसाठी ठीय्या आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

सिंदेवाही नगरपंचायतीवर महीलांचे पाणी,रोड,नालीसाठी ठीय्या आंदोलन

 सिंदेवाही/प्रतिनिधी:


सिंदेवाही येथील वार्ड नं.१२, १५, १६ येथिल महीलांनी आज नगरपंचायतीवर ठीया आंदोलन श्रमिक एल्गार एल्गारच्या नेतृत्वात करण्यात आले. वार्डात नगरपंचायतीचा लक्ष नसल्याने महीलांना अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. 

यामुळे महीलांनी मुख्याधिकारी यांना भेटण्याचा निश्चय केला. मात्र मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याने भेट झाली नाही. 

यावेळी श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी सिंदेवाही येथिल तीनही वार्डात महीलांची समस्या नगरपंचायतीने दुर करावी असे प्रशासनाला सांगितले. 
सिंदेवाही नगरपंचायत मध्ये मुख्याधिकारी नसल्याने प्रचंड तारांबळ उडाली होती. मात्र नगरपंचायतीचे उपाध्यक्ष हीतेश सुचक, नगरसेवक पेंदाम यांनी वेळीच आल्याने महीला शांत झाल्या. 

यावेळी पिण्याच्या पाण्याची सोय, सिमेंट रोड, नाली बांधकाम, हातपंप ची सोय, अॅरो मशीन ची सोय अशा मागण्या निवेदनातुन करण्यात आल्या. हीतेश उपाध्यक्ष सुचक यांनी सदर समस्या सोडविण्यात येईल अशी ग्वाही महीलांना दिली. 

यावेळी श्रमिक एल्गारचे महासचिव घनशाम मेश्राम, श्रमिक एल्गारचे तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार ,गुलाबराव बुरुले, शांताराम आदे, संगिता गेडाम, दुर्गा खोब्रागडे, बाळकृष्ण दुमाने, शुभम येरमे, यासह वार्डातील शेकडी महीला उपस्थित होत्या.