महावितरण कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२६ जून २०१९

महावितरण कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

नागपूर/प्रतिनिधी:
महावितरणमध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्य आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील महावितरण कार्यालयात आजोजित कार्यक्रमास मुख्य अभियंता(गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी अध्यक्षस्थानी होते.

 यावेळी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला फुले वाहून आदरांजली वाहीली. यावेळी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार अधीक्षक अभियंता उमेश सहारे , नारायण आमझरे, हरीश गजबे,अनिल घोगले, उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान)प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता प्रमोद धनविजय, दीपाली माडेलवर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात आदी उपस्थित होते.