भंडाऱ्यात अघोरी पूजा करणारा भोंदू बाबाला अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

भंडाऱ्यात अघोरी पूजा करणारा भोंदू बाबाला अटक

पवनी/मनोज चिचघरे: 


  मृत आईशी बोलणे करून देण्याची बतावणी करून पूजेसाठी ३१ हजार रुपयांची मागणी करणारा भोंदूबाबा व त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. दोन्ही आरोपींना २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.


 पवनी येथील आरोपी तरुणी अंकिता वय 19 काल्पनिक नाव हिने शिकवणी वर्गात मैत्रीण झालेल्या संगीता वय 19 काल्पनिक नाव राहणार पवनी हीला भावनेत अडकवून आई मरण पावली आहे, तिला करणी करून मारण्यात आले होते,तुझ्या भावाला सुद्धा अशाच रीतीने  मारल्या जाणार आहे, हे सगळे थांबायचे असेल तर तुला एक पूजा करावी लागेल, ही पूजा करण्यासाठी माझ्या ओळखीचा जितू अनिल मेश्राम रा, राजनांदगाव नावाचा महाराज आहे, तू त्याच्याकडून पूजा करून स्वतःचे जीवन व भावाच्या जीवन वाचव,अशी बतावणी करून मी सांगत असलेली खोटे वाटत असेल तर पूजा करून तुझ्या मृत्यू  आईला तुझ्याशी प्रत्यक्ष बोलायला लावण्यास महाराज सक्षम असल्याचे सांगितले.
भोंदू बाबाला अटक साठी इमेज परिणाम

  संगीताने शिकवणी वर्गातील अन्य मैत्रिणीकडून अंकिता बाबत अधिक माहिती घेतली असता ती अशाच रीतीने नवनीत अडकवून जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक आर्थिक लूटमार करीत असल्याचे माहीत झाले, संगीताने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून त्यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि पवनी पोलिसांनी सापळा रचून गोसीखुर्द धरणाच्या नहरा जवळ खापरी जंगलात शिवारात अघोरी पूजा करताना भोंदूबाबा जितू अनील  मेश्राम व अंकिता यांना अटक केली.

त्यांच्या जवळून पूजेचे साहित्य घुबडाचे पाय ,हडीची माळ, कोंबडा, देशी दारूची बॉटल, हवनाचे साहित्य आधी जप्त करून  जादूटोणा प्रतिबंधक कायदा 20 13 चे कलम 3 (2 )नवे गुन्हा नोंदविण्यात आला,सदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे पोलीस निरीक्षक पांगारे पोलीस हवालदार भरत ढाकणे संतोष चव्हाण किशोर देशमुख सचिन खरवते कळवते  यांनी सहकार्य केले.