युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधीमंडळात यावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ जून २०१९

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधीमंडळात यावे

-  आ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केली भावना 


मुंबई - दि . १३ जून २०१९ रोजी शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे याना आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या डॉ. नीलम गो-हे यांनी मातोश्री येथे आदित्य ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने भेटून सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच समाजोपयोगी कामासाठी म्हणून युवा सेवा फाऊंडेशन ला धनादेश दिला. माध्यमांशी बोलतांना नीलमताई गोर्हे म्हणाल्या, आज महाराष्ट्राची जनता एका अर्थानी विधानमंडळात व मंत्रालयात स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी अपेक्षा करतेय , वाट पाहतेआहे. जनतेचा आवाज विधिमंडळापर्यंत थेट पोहचेल, असे प्रतिपादन डॉ. नीलम गो-हे यांनी केले. 

ठाकरे घरण्याचे कुणीही विधीमंडळात आता पर्यंत आले नसेल तरी सुध्दा आदित्यजी आले तर मोठ्या प्रमाणात सामान्यांना आधार मिळेल व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आधारस्तंभ म्हणून लोकांचे काम करता येईल . मी आज अनेक अनेक शुभेच्छा दिलेल्या आहे . त्यामध्ये महाराष्ट्रात विधिमंडळात यावे महाराष्ट्रात नेतृत्व करावे ही शुभेच्छा आहे त्याचबरोबर हि देखील अपेक्षा आहे बाळासाहेब ठाकरे , उध्दवजी ठाकरे यांचे नाव विश्वासार्ह आहे तशीच विश्वासार्हता व किर्ती कायम शिवसेनेची टिकून राहावी अशी आमची आदित्यजींकडुन अपेक्षा आहे. उध्दवसाहेब ठाकरे, रश्मीताई ठाकरे यांच्या संस्कारातून आदित्य संवेदनशील नेतृत्व म्हणून काम करत आहेत परंतू वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. आज ठरवले तर महाराष्ट्राचा कुठल्याही विधानसभेचा मतदार संघातून निवडणुक लढवू शकतात, असेही नीलम गो-हे यांनी म्हटले आहे.