CTPS चंद्रपूर येथे एक्सिलेटरचे काम करताना स्फोट:३ कामगार जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

CTPS चंद्रपूर येथे एक्सिलेटरचे काम करताना स्फोट:३ कामगार जखमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:


चंद्रपूर येथील वीज केंद्रातील संच क्रमांक ८ आणि ९ मध्ये एक्सिलेटरचे काम करताना अचानक स्फोट झाला. यात तीन कामगार जखमी झाले. स्फोट तीव्र नसला तरी यात कामगारांना मोठी इजा झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूर वीज केंद्रातील आठ आणि नऊ संच अडीच वर्षांपूर्वी कार्यान्वित झाले. याच संचामध्ये रात्रपाळीत काम करीत असताना सुमारे साडेनऊच्या सुमारास एक्सिलेटर चालू-बंद करताना अचानक स्फोट झाला. यावेळी तिथे काम करणारे श्रीराम ढोरे, राहुल लोणारे आणि प्रवीण नावाचे कामगार भाजले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती आटोक्यातआणली. 

जखमींना डॉ. पालीवाल रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. स्फोटाची चौकशी केली जात आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध