महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक:दोघे फरार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जून २०१९

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक:दोघे फरार

चंद्रपूर/ललित लांजेवार:
मारहाण साठी इमेज परिणाम
महावितरणच्या कर्मचार्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.मागील ३ दिवसा अगोदर महावितरण चंद्रपूर विभागातील उपविभाग क्रमांक 2, शास्त्रीनगर शाखा कार्यालयात कार्यरत कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड यांना स्थानिक शामनगर गणपती चौक परिसरात इमरानं व जावेद शेख, शेरकी नामक तीन इसमांनी रात्री १०:१५ वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याच्या कारणावरून मारहाण केली होती. 

यावेळी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड कार्यालयात उपस्थित होते तर तक्रार निवारण तथा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात साठी अशोक गायकवाड हे वरिष्ठ तंत्रज्ञ व चिवंडे नामक विद्युत सहाय्यक हे दोघे हे गेले होते. विशेष म्हणजे शामनगर मधील वीजपुरवठा लगेच पूर्ववत केला होता. परंतु गणपती चौक शामनगर मधील इमरानं जावेद व शेरकी यांनी वीज गेल्यावर लगेच शास्त्री नगर कार्यालय गाठत पाणी कॅन, खुर्च्या आदी तोडत कार्यालयात उपस्थित कर्मचारी पी.एस.राऊत व एस.के.गायकवाड यांना मारहाण केली होती. 

रामनगर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात भा.द.वि. च्या 353, 332, 504,505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व या तिघापैकी पोलिसांनी केलेल्या सहकार्यातून अखेर जावेद शेख यास अटक करण्यात झाली आहे. कर्तव्य पर्यंत पडतांना महावितरण कर्मचारी व अधिकारी यांना असामाजिक तत्त्वांना सामोरे जावे लागते . त्यामुळे अशा मारहाणीच्या तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याच्या घटनात दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित असते. भारतिय दंड संहिते मधील कलम 153 म्हणजे सरकारी कामात आडकाठी आणने हे अशा असामाजिक तत्वांविरोधात मोलाचा उपाय ठरत आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध