९ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जून २०१९

९ महिन्याच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू

ललित लांजेवार/नागपूर:
सावली वनपरिक्षेत्रा अंतर्गत बोथली परीसरात एका 9 महिन्याच्या पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली, या बछड्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला त्याचा अजूनही तपास लागला नाही.

सदर वाघ हा 9 महिन्याचा आहे.या बाबत ची माहिती वनविभाग सावली ला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे,वनपाल धुर्वे  हे आपल्या चमू सह घटनास्थळी गेले.सदर घटने चा पंचनामा करून पशु विभाग च्या तज्ञ चमू कडून शव विच्छेदन करण्यात आले असून नेमके मृत्यू कशाने हे अहवाल  प्राप्त झाल्यावरच  कळणार आहे.

मात्र भूकबळी ने तर मृत्यू नाही ना असा कयास लावल्या जात आहे.बोथली परिसरात घटनेची माहिती होताच अनेकांनी बघण्यासाठी गर्दी केली.