धक्कादायक:चंद्रपुरात ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ जून २०१९

धक्कादायक:चंद्रपुरात ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

मूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
नागपूर/ललित लांजेवार:

शेतीकामाचे दिवस सुरु असल्याने आई-वडील शेतावर गेलेलं होते,हीच संधी साधात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरा नजीक असलेल्या नागाळा गावात  एका २० वर्षीय नराधमाने नातेसंबंधात भाची लागणाऱ्या ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केला.हि घटना शनिवारी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली.

प्रशांत विश्वनाथ कनवते वय 20 वर्षे रा. नागाळा असे आरोपीचे नाव असुन त्यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 376 भांदवी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  हि अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घराशेजारी राहत होती,त्यांच्यात मामा-भाचीचे नातेसंबध होते.मुलीच्या आईचा आरोपी प्रशांतवर खुप विश्वास होता.मात्र त्याच प्रशांतने बहिणीच्या विश्वासाला तडा दिला व भाचीवर अत्याचार केला.

 आई घरी आल्यावर सदर बाब मुलीने आईला सांगीतली, दरम्यान अल्पवयीन मुलीला घेवून मूल पोलीस स्टेशन गाठुन येथील उपजिल्हा रूग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, या तपासणीत  अत्याचार झाल्याचे सिध्द झाले. 

पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक करत  आरोपीवर कलम 376 भांदवी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चौधरी करीत आहेत.

घटनास्थळाला प्रभारी उपविभागीय अधिकारी शेखर देशमुख, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी भेट दिली.

आरोपीला फाशीची शिक्षा द्या
नागभीड येथे या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.
पोल्ट्रीफीड उपलब्ध
 वरील नंबर वर फोन करा
 आणि मिळावा उत्तम दर्जाचे फिड