धक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणीवर लग्नाचे आमिष देऊन नागपुरात बलात्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जून २०१९

धक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणीवर लग्नाचे आमिष देऊन नागपुरात बलात्कार

 वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नागपूर / अरूण कराळे :


आयुध निर्माणी अंबाझरी डिफेंस येथे प्रशिक्षणार्थी असलेल्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून सतत दोन वर्षे शारीरिक संबंध स्थापित करण्याची घटना पुढे आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.प्राप्त पोलीस सूत्रांच्या माहितीनुसारआयुध निर्माणी अंबाझरी येथे चंद्रपुर जिल्ह्यातील एक तरुणी की एक ऑगस्ट २०१६ ते २०१७ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत होती.या दरम्यान डिफेंस निवासी आरोपी विनय प्रदीप चव्हारे वय २६ यांचेशी ओळख झाली तो पीडित तरुणीसोबत सेक्शन एफटीआई मध्ये कार्यरत होता.त्याने तिच्या सलगी साधत जवळ येण्याचा प्रयत्न केला तरुणी विनयच्या जाळ्यात फसली.

तो तिला नागपुर शहरातील वेगवेगळ्या बगिच्यात तसेच फुटाळा तलाव परिसरात नेहमी फिरायला घेऊन जात असे हळूहळू त्याच्या प्रेम वाढत गेले असता एक दिवस विनयने तरुणीला शारीरिक सुखाची मांगणी केली असता युवतीने नकार दिला म्हणून आरोपीने लग्नाचे आमिष देऊन तिला वेगवेगळे स्वप्ने देऊ लागला पीडिता त्याच्या या खोट्या आश्वासनाला बळी पडून २०१६ ते २०१८ पर्यंत सतत शारीरिक संबंध ठेवत जबरदस्तीने दुष्कर्म करु लागला.विनयचे प्रशिक्षण पूर्ण होताच त्याला जबलपुर येथे नोकरी लागली तो पीडिताला जबलपूरला बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.

रोपी आपल्या सोबत लग्न करणारच आहे.त्यामुळे पीडिता कोणताही विचार न करता त्याच्याकडे नेहमी जात होती.तेंव्हा मित्राच्या खोलीवर तिच्याशी संबंध करायचा पीडिताने लग्नाविषयी विचारले असता तू लग्नाचे टेन्शन घेऊ नको असे म्हणत वेळ मारून टाळाटाळ करायचा तेंव्हा ही प्रेम कहाणी पीडिताने आपल्या आई वडिलांना सांगितले असता पीड़िताचे वडील विनयला जबलपुरला जाऊन भेटले व विनयच्या परिवाराला नागपुर येथे भेटून दोघांच्या लग्नाची गोष्ट केली यानंतर आरोपीने पीडिताशी फोनवर बोलणे बंद केले.नागपुर येथील नातेवाईकही राहत्या ठिकाणावरून गायब झाले .

तेंव्हा आपली फसवणूक झाली आहे,असे पीड़िताच्या लक्षात येताच वाड़ी पोलीस स्टेशन गाठून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक यांच्यासमोर संपूर्ण कहाणी सांगितली असता घटनेची गंभीरता लक्षात घेता ठाणेदार पाठक यांनी डीसीपी विवेक मासाळ यांचे मागदर्शन घेऊन आरोपी विनय प्रदीप चव्हारे याचे विरोधात कलम ३७६ , २ ( के ) ( एन ) ४१७ नुसार गुन्हा नोंद केला,पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे.
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध