जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह गडचिरोली पोलिसांनी केली अटक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जून २०१९

जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला पतीसह गडचिरोली पोलिसांनी केली अटक

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
गडचिरोली/प्रतिनिधी:


गडचिरोली पोलिसांना एक मोठी कारवाई करण्यात बुधवारी यश मिळाले आ,हे जहाल माओवादी चळवळीचा सूत्रधार नर्मदक्का व तिचा माओवादी नवरा किरणला महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरुन  सिरोंचा बसस्थानकावरुन गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गडचिरोली पोलिस मागील अनेक दिवसांपासून नर्मदाक्का व किरणकुमार यांचा शोध घेत होते. दोघेही तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी तेलंगणा पोलिसांच्या सहकार्याने नर्मदाक्का व किरणकुमार यांना सोमवारी(ता.१०)संध्याकाळी सिरोंचा बसस्थानकावरुन अटक केली.

पंचवीस पेक्षा जास्त नागरिकांच्या हत्येचा नर्मदक्कावर आरोप आहे,तर १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात १५ पोलिस व एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. या घटनेची जबाबदारी नक्षल्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोने स्वीकारला होती. या ब्युरोची प्रमुख असल्याने नर्मदाक्का तिचा पती किरणकुमार यांच्यावर जांभुळखेडा भुसुरुंगस्फोटाच्या गुन्ह्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

नर्मदक्कावर सत्तर पेक्षा जास्त गुन्हे दाखल असुन यात हत्या चकमकी सह  जाळपोळीच्या गुन्हयाचा समावेश आहे..नर्मदक्का ही मुळची आंध्रप्रदेशातल्या कृष्णा जिल्हयातली रहिवासी आहे.

नर्मदक्का माओवाद्याच्या पश्चिम सब झोनल कमांड समितीची सचिव  आणि दंडकारण्य झोनल समितीची सदस्यही आहे,गडचिरोली आणि गोंदीया या दोन जिल्हयातल्या माओवाद्याच्या कारवाया तिच्याच नेतृत्वात चालतात.अशी माहिती आहे,

तिच्यावर तीन राज्याच सत्तर लाख रुपयांच बक्षीस आहे  तर तिचा पती असलेला जहाल माओवादी किरण हा माओवाद्याच्या दंडकारण्यातल्या मिडीया विभागाची सुञे सांभाळण्यासह प्रभात नावाचं माओवादी विचाराच मासिक प्रकाशित करण्यासह माओवाद्याच्या भुमिका आणि इतर घडामोडी संदर्भात पञके तयार करुन प्रसार माध्यमापर्यंत पोहचवण्याची जबाबदारी किरणवर होती.

तो ९ एमएम पिस्टल हे शस्त्र वापरायचा. त्याच्यावरही महाराष्ट्र शासनाचे २५ लाखांचे बक्षीस होते.या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व हरी बालाजी उपस्थित होते. 
सर्व प्रकारचे पोल्ट्रीफीड उपलब्ध