चंद्रपूर शहर मनपा महिला व बालकल्याण समितीवर १२ सदस्यांची नियुक्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

चंद्रपूर शहर मनपा महिला व बालकल्याण समितीवर १२ सदस्यांची नियुक्ती

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीवर जुन्या सदस्यांची मुदत संपुष्टात आल्याने१२ सदस्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे. यात भारतीय जनता पक्षाचे ८, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे २, बहुजन समाज पार्टीचे १ तर शहर विकास आघाडीच्या एका सदस्याचा समावेश आहे. १८ जून रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिका येथील राणी हिराई सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत प्रमाणशीर प्रतिनिधित्व देऊन १२ सदस्यांची नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यात आली.

पक्षीय तौलनिक बळानुसार व ०४ बंद लखोट्यामधे सर्व गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नगरसेवकांच्या नावानुसार मा. महापौरांनी समितीच्या १२ सदस्यांची नियुक्ती केली. त्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सभागृह नेता व गटनेता श्री. वसंत देशमुख यांनी दिलेल्या नावानुसार सौ. शीतल रवींद्र गुरनुले, सौ. चंद्रकला पंडित सोयाम (बल्की), सौ.आशा विश्वेश्वर आबोजवार, सौ.शीतल किशोर आत्राम, सौ.संगीता राजेंद्र खांडेकर, सौ. वंदना सुरेश जांभुळकर, सौ. ज्योती गणेश गेडाम, सौ छबूताई मनोज वैरागडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेता डॉ. सुरेश महाकुलकर यांच्यातर्फे सौ.ललिता राजेश रेवल्लीवार व सौ. संगीता मंगल भोयर, बहुजन समाज पार्टीतर्फे सौ. पुष्पा प्रमोद मून तर शहर विकास आघाडीचे प्रदीप ( पप्पू ) देशमुख यांच्याकडून सौ. मंगला राजेंद्र आखरे यांची नावे सभागृहाला प्राप्त झाली होती. मा. महापौर सौ. अंजली घोटेकर , उपमहापौर श्री. अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती श्री. राहुल पावडे तसेच आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी सर्व  सदस्य तसेच मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.