काळी पिवळी टॅक्सी कोसळल्याने ६ महिला ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ जून २०१९

काळी पिवळी टॅक्सी कोसळल्याने ६ महिला ठार


भंडारा : अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरल्याने आज दुपारी वडापाच्या ट्रॅक्सला झालेल्या अपघातात पाच तरुणींसह एक महिला ठार झाली आहे. तर सहा जण जखमी आहेत. 

साकोली-लाखांदूर मार्गावरील धर्मपुरी येथील चुलबंद नदीवर हा अपघात झाला. काळी पिवळी टॅक्सी पुलावरून खाली नदीपात्रात कोसळल्याने सहा जण ठार झाले. महिलांची ओळख पटविणे सुरु असून जखमींना साकोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.