जिल्हा परिषदेच्या ५२८ शिक्षकांच्या बदल्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जून २०१९

जिल्हा परिषदेच्या ५२८ शिक्षकांच्या बदल्या

चंद्रपूर/प्रतिनिधी:
जिल्हा परिषद चंद्रपूर साठी इमेज परिणाम
 राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार शिक्षक संवर्गाच्या बदल्या ऑनलाइन करण्याचे धोरण राबविले जात असून, त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत ५२८ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पदवीधर शिक्षकांचाही समावेश असून, बदली प्रक्रियेमध्ये ८२ शिक्षक विस्थापित झाल्याने त्यांना पुढील आदेशानुसार नियुक्‍ती दिली जाणार आहे. 

या शिक्षकांना त्वरित बदली झालेल्या ठिकाणी नियुक्‍त व्हावे लागणार आहे. शासनाच्या आदेशानुसार नवीन ठिकाणी नियुक्‍त केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.