पवनीच्या वैनगंगा नदीत बुडून उमरेडच्या तरुणाचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

पवनीच्या वैनगंगा नदीत बुडून उमरेडच्या तरुणाचा मृत्यू


मौज मस्ती जीवावर बेतली...

  पवनी येथील वैनगंगा नदीच्या पुलाखालील पाञात एक इसम खोल पाण्यात गेला आणि तिथेच तो बुडाला असल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली,खोल पाण्यात बुडाल्यामुळे सदर इसमाचा मृत्यू झाला.

        नागपूर जिल्ह्यातील उमरेड व नागपूर येथील स्नेहल किशोर नंदेश्वर वय २१ वर्ष राहणार उमरेड,प्रज्वल राजेश बावणे वय १९ वर्ष राहणार नागपूर,प्रज्वल अशोक मोटघरे वय १९ वर्षे राहणार उमरेड,दुर्गेश रूपचंद वय २१ वर्षे राहणार नागपूर,हर्षल राजेश बावणे वय १९ वर्ष राहणार नागपूर,महेश कुषाल बावणे वय १८ वर्षे,शैलेश रूपचंद १९ वर्षे नागपुर,हे सर्व मित्र पवनी येथे फिरायला आले होते.

       फिरता फिरता सर्व मित्र नदीपात्रात आंघोळी करिता पुलाच्या खाली पाण्यात उतरले.आंघोळ करीत असताना स्नेहल किशोर नंदेश्वर वय २१ वर्षे राहणार उमरेड,हा अचानक खाबा जवळील खोल पाण्यात गेला व  बुडाला.

        मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर लोकांनी स्नेहलला पाण्याच्या बाहेर काढले,तेव्हा तो जिवंत होता.

     १०८ एम्बुलेंसनी सरकारी दवाखान्यात स्नेहलभरती केले,डॉक्टरांनी तपासून मरण पावल्याचे सांगितले.पवनी पोलिसांनी मर्ग दाखल केला