मूक प्राण्यांना पाणी पिण्यासाठी 151 टाके लावणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

मूक प्राण्यांना पाणी पिण्यासाठी 151 टाके लावणार


प्राण्यांप्रति पुलक मंच परिवार समर्पित

नागपूर : नागपुरातील उष्ण तापमानामुळे प्रत्येक व्यक्ति तहानेने व्याकुळ होतो परंतु मूक प्राणी काही सांगू शकत नाही, तहान लागल्यावर लांब अंतरावर पाण्यासाठी भटकंती करावी लागते हाच उद्देश घेऊन अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच शाखा महावीर वार्ड नागपूर ने मूक प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी 151 टाके लावण्याचा संकल्प केला आहे. मूक प्राणी पाण्याविना राहु नये यासाठी भारत गौरव राष्ट्रसंत मुनिश्री पुलकसागरजी गुरुदेवांच्या 49 व्या अवतरण दिनानिमित्त आयोजित पुलक पर्वात मोहिम हाती घेतली आहे. मोहिमेचा शुभारंभ श्री. दिगंबर जैन सेनगण मंदिरचे अध्यक्ष सतीश जैन पेंढारी, श्री. दिगंबर जैन नि:सही संस्थानचे अध्यक्ष सुरेशभाऊ आग्रेकर, सुप्रसिद्ध मोटिवेटर संजय नखाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सतीश जैन पेंढारी म्हणाले हा चांगला उपक्रम आहे, मूक प्राण्यांप्रति सर्वानी सेवेचा भाव ठेवला पाहिजे. याच शाखेने नेहमी नवीन-नवीन संकल्पना व नवीन-नवीन विचार समोर आणले. काही नवीन पण कठीण कार्य पुलक मंचाचे कार्यकर्ते सहजतेने करतात. प्राण्यांच्या सेवेचा मनात असने आवश्यक आहे. मनात संवेदना असेल तर कार्य होत राहते. पुलक मंचाचे एकमात्र संघटन आहे ते करुन दाखविते. मुनिश्री पुलकसागरजीचे भक्त चांगले कार्य करीत आहे, या कार्यकार्त्यांना वेगळया प्रमाणपत्राची आवश्कता नाही. पाण्याचे टाके लावणे सुरु असून ज्या व्यक्तिला पाहिजे त्याला नि:शुल्क दिल्या जाते, एवढेच फक्त त्याने दररोज टाक्यात पाणी टाकले पाहिजे साफसफाई केली पाहिजे. या उपक्रमासाठी पुलक मंच परिवाराचे राष्ट्रीय सांस्कृतिक मंत्री मनोज बंड यांच्या संयोजनात शरद मचाले, कुलभुषण डहाळे, नरेश मचाले, रमेश उदेपुरकर, अनंतराव शिवणकर, प्रकाश उदापुरकर संयोजन समिती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातुन लोकांपर्यंत माहिती पोहोचविल्या जात आहे त्याला प्रतिसादही मिळत आहे. पुलक मंचाच्या महावीरनगरातील कार्यालयासमोर प्रथम टांके प्राण्यांसाठी समर्पित केले आहे. शेषनगर, खरबी रोड, न्यू सहकारनगर, रमना मारोतीच्या मागे, इंदिरा भोसले विहार तुळशीबाग, झेंडा चौक महाल, गणेशपेठ, बजाजनगर, गणेशनगर, जूनी शुक्रवारी या भागात लावले आहे आणि लावणे सुरु आहे. ज्यांना टाके पाहिजे किवा सहयोग करायचा असल्यास त्यांनी मनोज बंड मो. 88066 67753 यांचेशी संपर्क करावा. कार्यक्रमाचे संचालन मनोज बंड, प्रास्ताविक शरद मचाले यांनी केले. कुलभुषण डहाळे, अनंतराव शिवणकर, प्रकाश उदापुरकर, नरेश मचाले, रमेश उदेपुरकर, अमोल भुसारी, संजय पांडवकर, निलय मुधोळकर, सुरेश महात्मे, छाया उदापुरकर, शुभांगी लांबाडे, विभा भागवतकर, मंगला शिवणकर, स्वाती तुपकर आदि उपस्थित होते.