गरीब, गुणवान विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मे २०१९

गरीब, गुणवान विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित प्रवेश  • भिवकुंड व चिमूर शासकीय निवासी शाळेत प्रवेश देणे सुरू
  • सामाजिक न्याय विभागाच्या पब्लिक स्कूललाही मागे टाकणाऱ्या शाळा
  • भिवकुंड मुलांसाठी तर चिमूर येथे मुलींसाठी प्रवेश प्रक्रीया
  • सेमी इंग्लीश शाळेची 100 टक्के निकालाची परंपरा


चंद्रपूर, दि. 3 एप्रिल: तुम्ही अनुसूचित जाती जमाती व अन्य वंचित घटकातील असाल व तुमचा पाल्य अतिशय गुणवान असेल तर सहावी ते दहावी या वर्गासाठी एखाद्या खाजगी पब्लिक स्कूलला ही मागे टाकेल अशा समाज कल्याण विभागाच्या दोन शाळा जिल्हयात प्रवेशासाठी सज्ज आहे. दहावी बारावीत शंभर टक्के निकाल देणाऱ्या या शाळा विद्यार्थ्यांचे आयुष्य पालटणारे ठरल्या असून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय निवासी शाळेत वर्ग 6 ते 10 व्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व दिव्यांग प्रवर्गांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात 2012 पासून भिवकुंड, तालुका- बल्लारपूर व चिमूर येथे वर्ग 6 वी ते 10 वी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमाची शासकीय निवासी शाळा सुरू करण्यात आलेली आहे. भिवकुंड येथे मुलांसाठी तर चिमूर येथे फक्त मुलींसाठी शाळा राखीव आहेत. याकरिता सहावी ते दहावीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यमांना प्रवेश देणे सुरू आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाला 80 टक्के आरक्षण, तर अनुसूचित जमाती प्रवर्ग 10 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्ग 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के, दिव्यांग प्रवर्ग 3 टक्के अशा रीतीने आरक्षण राहील.

या शाळांमध्ये प्रवेशासाठी 15 एप्रिलपासून प्रवेश अर्ज वाटपाचे काम सुरू असून त्याची 31 मे पर्यंत मुदत आहे. तर विद्यार्थ्यांचे अर्ज10 जून पर्यंत स्वीकारले जाणार आहे. मुख्य प्रवेश प्रक्रिया 11 जून ते 25 जून या कालावधीत होणार आहे. प्रवेश अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, चंद्रपूर या कार्यालयाशी संपर्क करावा.

तसेच भिवकुंड व चिमूर येथील शासकीय निवासी शाळेच्या कार्यालयाशी संपर्क करावा. या शाळांमध्ये प्रवेशाकरिता अर्जासोबत विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला, विद्यार्थ्यांचा रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड विद्यार्थ्यांचा बँक पासबुक व विद्यार्थ्यांचा पासपोर्ट साईज फोटो ही आवश्यक कागदपत्रे आहेत. तरी होतकरू विद्यार्थ्यांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे करण्यात येत आहे.

या शाळांची वैशिष्ट्ये: शाळांचा मागील दोन वर्षाचा दहावीचा 100 टक्के निकाल, अनुभवी शिक्षक वर्ग, आधुनिक इमारत व सोयी सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा, ई लर्निंग सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज व्यायामशाळा, जेवणाची व निवासाची सोय, उत्कृष्ट क्रीडांगण, विद्यार्थ्यांसाठी मनोरंजन कक्ष, उत्तम वर्गखोल्या, संगणक कक्ष,आहे. गुणवान शिक्षक या शाळेचे वैशीष्टय असून शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात यामुळे कायापालट झाला आहे.