चारचाकीतून जप्त केली दारू; आरोपी जंगलातून गेला पळून - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

चारचाकीतून जप्त केली दारू; आरोपी जंगलातून गेला पळून

 प्रशांत गेडाम/प्रतिनिधी

सिंदेवाही- सिंदेवाही पोलिस स्टेशन हद्दीमध्ये (SDPO  ) मा. परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दारुची रेड करण्यात आली. सिंदेवाही पोलीस स्टेशन चे  अंतर्गत येत असलेल्या मेंढा माल गाव चारगाव (डोंगरगाव) कडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकेबंदी केली असता. मारुती  800 लाल रंगाची गाडी क्रमांक mh-34  k-8 74 येताना दिसले. ती थांबून झडती घेत असता. त्यामध्ये 6 नग. पांढऱ्या खोक्यांमध्ये विदेशी दारू आढळून आली . त्यामधला दोन आरोपी पैकी एक आरोपी बसलेला झुडपी जंगल चा फायदा घेत पळून गेला व एक आरोपी ताब्यात असून नामे किरण रमेश रोडके रा. तुमसर जि. भंडारा याला अटक करण्यात आली.एकूण Impereal Blue चे सहा खोके किंमत ८६,४००/- व  मारुती ८०० किंमत १,५०,००० असा एकूण २,३६,४००/- रु चा मुद्देमाल मिळून आला. ही कारवाई psi आनंद कुमार खंडाळे , psi जी .पी .पाटील ,psi शरद आवारे व सिंदेवाही पोलीस स्टेशन  पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने यांनी केली .आरोपीस अटक करून कलम 65 म.दा.का भा.द.वि .188  नुसार कारवाई करीत आहेत.  व पुढील तपास सिंदेवाही पोलीस स्टेशन करीत आहे.