अवैध सावकाराच्या मायाजाल मधून नागरिकांना बाहेर काढावे - प्रतिमा ठाकूर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

अवैध सावकाराच्या मायाजाल मधून नागरिकांना बाहेर काढावे - प्रतिमा ठाकूरचंद्रपूर - नोंदणीकृत सावकार यांना आरबीआय तर्फे निर्देश असतात जेव्हा आपण व्याजाने पैसे देतो त्यावेळेस व्याजदर हा 1 ते 1.5 टक्के इतका असावा परंतु सावकार या नियमाला डावलून जास्त पैसे कमविण्याच्या नादात नागरिकांच्या गरजेचा फायदा घेत 5, 10 ते 15 टक्के व्याजदर घेत असतात.
लोकांना वेळेवर पैश्याची गरज भासली तर ते व्याजाकडे बघत नाही परंतु जेव्हा रकमेची परतफेड करण्याची वेळ येते तेव्हा मुद्दल तर वेगळा राहतो नागरिक फक्त व्याज देत असतात यामुळे सावकारांचा नेहमी फायदा होत असतो.
7 मे ला सरकारनगर येथे सावकाराने कर्ज घेतलेल्या परिवारावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये पीडित रघुनाथ हरिनखेडे यांची पत्नी 60 टक्के जळाली, इंजिनिअर मुलगा सुद्धा या जाळपोळ मध्ये काही प्रमाणात भाजला गेला. आज या सावकाराना कायद्याची काही भीती राहलेली नाही, काही पैश्यासाठी हे लोकांचा जीव सुद्धा घ्यायला तैयार झाले आहे. म्हणून आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती आहे की आपल्यातर्फे नागरिकांना असल्या सावकारांपासून सजग राहण्याचे आवाहन करण्यात यावे व जे नागरिक जास्त व्याजदराच्या मायाजाल मध्ये फसले आहे त्यांना तेथून बाहेर काढण्यात यावे.असल्या अवैध साहूकारांचे परवाने रद्द करण्यात यावे, जेणेकरून पुन्हा अश्या घटना घडणार नाही, नाहीतर अश्या सावकाराना मनसे आपल्या परीने उत्तर देणार.
दिलीपभाऊ रामेडवार,राहुल बालमवार,भरत गुप्ता, माया ताई मेश्राम,प्रकाश नागरकर,महेश शास्त्रकार,ज्योत्स्ना सावरकर,कृष्णा लुथडे, फिरोज शेख,सत्यजित सहा यांची उपस्थिती होती.