वाळू तस्करी वाहतूकीवर कारवाई करा - मिथुन मेश्राम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०१९

वाळू तस्करी वाहतूकीवर कारवाई करा - मिथुन मेश्राम

सिंदेवाही- - सिंदेवाही येथे आज दिनांक 14 ला  तहसील कार्यालय सिंदेवाही तहसीलदार यांना   शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले. काही दिवसा आधी सिंदेवाही तालुक्यात रेती घाटाचे लिलाव झाले होते. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी  २/५/२०१९ ला रेती घाटावर स्थगिती आणून बंद करण्यात आले.

 परंतु रेती माफिया जेसीबी मशीन साह्ययाने उपसा करून हायवा ट्रक ने रात्रंदिवस वाहतूक करीत आहे. मात्र याकडे सिंदेवाही तहसील कार्यालयाचे कमालीचे  दुर्लक्ष दिसून येत आहे .

हायवा ट्रक वाहनांचे वेग मर्यादित नसल्यामुळे खूप मोठ्याप्रमाणात दुर्घटना,अपघात होण्यास नाकारता येत नाही. या अगोदर सिंदेवाही तालुक्यात  अशाप्रकारे रेती वाहतूक करताना(हायवा)  ट्रँकनी  अपघात होवुन जीवितहानी झाली आहेत. आणि रेती तस्करी करून शासनाच्या करोडो रुपयाची मालमत्ता रेती माफिया खाऊन राहिले आहेत. तेव्हा सदर प्रकार होऊ नये .याकरिता तहसील कार्यालय विभागाकडून भरारी पथकाची नियुक्ती करून शासनाचा करोडो रुपयाचा  होनारे नुकसान वाचवावे, अशा प्रकारच्या निवेदन मिथुन मेश्राम जिल्हाऊपप्रमुख युवासेना (शिवसेना ) यांनी सिंदेवाही तहसीलदार यांना दिलेले आहे.