तांत्रिक बिघाड एका रात्री दुरुस्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मे २०१९

तांत्रिक बिघाड एका रात्री दुरुस्त

  •  मनपा अधिकाऱ्यांनी  केला चंद्रपूर शहराचा 
  • पाणीपुरवठा सुरळीत....
  • सुट्टीच्या दिवशीही नागरिकांच्या सेवेत 


चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे तांत्रिक अडचणीं मुळे शहराच्या काही भागात १ दिवसासाठी बंद झालेला पाणीपुरवठा पुर्वरत करण्यातआला असून तुकूम जलशुद्धीकरण झालेला बिघाड रात्रभरात पालिकेतर्फे दुरुस्त करण्यात आला आहे. शहराच्या तुकूम जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिकबिघाड झाल्याने चंद्रपूर शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद होता यामुळे नागरीकांची होणारी अडचण लक्षात घेता आयुक्तसंजय काकडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी, रवींद्र कळंबे, नरेंद्र पवार, अतुल टिकले यांनी अहोरात्र काम करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळविले आहे. येत्या १-२ दिवसात संपूर्ण चंद्रपूर शहरात पाणीपुरवठासुरळीत होणार आहे.


तुकूम जलशुद्धीकरण केंद्राच्या रोहित्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याकारणाने चंद्रपूर शहरातील किल्याचा आतील भाग वगळता उर्वरित शहराचापाणीपुरवठा एक दिवसाकरीता बंद होता. मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संपूर्ण रात्र अहोरात्र काम करूनदोन्ही पंप सुरु करण्यात यश मिळविले आहे. त्यानुसार आता संपूर्ण चंद्रपूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तांत्रिक बाबींउलगडणे सहज सोपी नसतांना सुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी संपूर्ण रात्र ड्युटीवर राहून पाणीपुरवठा करणारे पंप सुरू करण्यात यश मिळविले आहे. शासकीय सुट्टीचा लाभ न घेता उन्हाळ्याच्या दिवसात मनपा कर्मचारी काम करतात, संपूर्ण देशात सगळ्यात उष्ण शहराची नोंद चंद्रपूर शहराची आहेत्यानुसार पाणीपुरवठ्याची समस्या इतर शहरांपेक्षा अधिक असणे अपेक्षित असतांना सुद्धा चंद्रपूर मनपातर्फे जबाबदारीने काम करून पाण्याच्यासमस्येची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत.

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे, कधी तांत्रिक बिघाडामुळे समस्या उद्भवते त्यासाठी पालिका अधिकारीकर्मचारी वर्ग दिवसरात्र कार्यरत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी मनपा कटीबद्ध आहे, नागरिकांनी याकरीता साथ द्यावी
- आयुक्त संजय काकडे