राज्यस्तरीय बालकथा व काव्यलेखन स्पर्धा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

राज्यस्तरीय बालकथा व काव्यलेखन स्पर्धा

नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर च्या वतीने राज्यस्तरीय निशुल्क 'बालकथा व काव्यलेखन' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक 'स्व. अश्वस्थामा मेश्राम' यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा आयोजित असून इच्छुकांनी 'बालकथा व कविता' (विषयाचे बंधन नाही) मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या ७३८५३६३०८८ या व्हाट्सएप वर  दिनांक २० मे २०१९ पर्यंत पाठवावे.


स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र दि २२/०५/२०१९ रोजी अर्जुनी/मोरगाव जि. गोंदिया येथे होत असलेल्या भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धा व कवी संमेलनात  प्रदान करण्यात येईल. कवी संमेलनात सहभागी होण्यासाठी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यांशी संपर्क करावा.