महाविनाशकारी ‘फोनी’ चक्रीवादळ येत्या 9 तासात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मे २०१९

महाविनाशकारी ‘फोनी’ चक्रीवादळ येत्या 9 तासात


उत्तर पूर्व दिशेला सरकेल, वादळाचा वेग मंदावण्याची शक्यता

नवी दिल्ली, 3 मे 2019
महाविनाशकारी ‘फोनी’ चक्रीवादळाचा जोर आता काहिसा ओसरला असून त्या वादळाचं रुपांतर अति जोरदार वादळात झाले आहे. दुपारी साडेबारा वाजता हे वादळ भुवनेश्वरपासून पूर्व-इशान्य दिशेला 18 कि.मी. वर तर कटकपासून दक्षिण पूर्व दिशेला 20 कि.मी. अंतरावर केंद्रीत होते.

सध्या या वादळामुळे ताशी 155 ते 165 कि.मी. वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा जोर 180 कि.मी. पर्यंत पोहचू शकतो. भुवनेश्वर विमानतळावर सकाळी साडेअकरा वाजता ताशी 92 ते 130 कि.मी. वेगाने वारे वाहत होते.

‘फोनी’ चक्रीवादळ उत्तर, उत्तर-पूर्व दिशेला सरकून पुढील 9 तासात वादळाचा वेग मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.