पिपरी देशपांडे शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यांना आग - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

पिपरी देशपांडे शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यांना आग


चंद्रपूर - पोंभूर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे गावालगत शेतातील तणसाच्या ढिगाऱ्यांना आग  लागली. ही आग गावाकडे सरकत असल्याचं लक्षात येताच खळबळ उडाली. लागूनच वस्ती असल्यानं एकच धावपळ सुरू झाली. महावितरण कंपनीच्या कामात त्रुटी असल्यानं स्पार्क होऊन तणशीच्या ढिगाऱ्यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ही आग त्यातूनच लागल्याचं गावकरी सांगत आहेत. ही आग एवढी मोठी होती की, लोकांनी घाबरून जाऊन घरापुढील मंडप तोडून टाकले, घरातील सामान बाहेर काढलं. आग विझवण्यासाठी आणि ती गावात येऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी मिळेल ते साधन घेऊन प्रयत्न केले. येथील एका कामावर असलेलं टँकर आणलं गेलं. त्यामुळं आग विझवण्यात मोठा हातभार लागला. महावितरणच्या चुकीच्या कामामुळं आज एक गाव बेचिराख होता होता वाचलं. त्यामुळं असं जीवघेणं काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.