एक दिवशीय मोफत चित्रपट कार्यशाळेचे आयोजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

एक दिवशीय मोफत चित्रपट कार्यशाळेचे आयोजन
चंद्रपूर - शहरात पहिल्यांदाचन मोफत चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि चित्रपट आस्वाद ह्यावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ह्या एक दिवशीय कार्यशाळेत चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, लघुपट, माहितीपट, वेब सिरीज, सिनेमा बनवण्याची कला आणि तंत्रज्ञान ह्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

ह्या एक दिवशीय कार्यशाळेला शैलेश भीमराव दुपारे ह्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. शैलेश भीमराव दुपारे हे ‘भारतीय फिल्म आणि टेलिवीजन संस्थान,FTII) पुणे येथील विद्यार्थी असून त्यांनी सचिन खेडेकर अभिनित ‘तार्यांचे बेट’ हा मराठी सिनेमा लिहिला असून ‘का रे दुरावा’ ह्या मराठी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तसेच चंद्रपूरचा स्थानिक कलावंताना घेवून चंद्रपूर मध्ये ‘नूर’ तसेच मराठी अभिनेत्री सई ताम्हनकर ह्यांचा सोबत ‘नो स्मोकिंग प्लीज’ हे लघुपट तयार केले आहेत.

कार्यशाळा १९ मे, रविवार, सकाळी १० ते ६ ह्या वेळेत ‘वासनिक सर एकाडमी’, जुबिली शाळेचा बाजूला, शासकीय वाचनालयाजवळ, लक्ष्मी डिजिटल लँबचा पुढे, कस्तुरबा रोड, चंद्रपूर इथे आयोजित केली आहे.

ह्या कार्यशाळेत कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा असे आव्हान वासनिक सर अकादमीचे संचालक श्री संजय वासनिक ह्यांनी केले आहे.