मृत जनावरे फेकली जुनोना जंगलात;गोरक्षण संस्थेचा प्रकार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

मृत जनावरे फेकली जुनोना जंगलात;गोरक्षण संस्थेचा प्रकार


चंद्रपूर/प्रातिनिधी:
 चंद्रपूर पासून जवळच असलेल्या लोहारा येथील गोरक्षण संस्थे कडून मृत पावलेल्या गाई काही दिवस अगोदर लोहारा गावालगतच फेकण्यात आल्या होत्या, नंतर त्याची गावभर दुर्गंधी पसरल्याने गावकर्यांनी तक्रार केली, त्यामुळे त्या मृत पावलेल्या गाई जुनोनाच्या जंगलात फेकण्यात आल्या, ह्याच्या आधी सुद्धा गोरक्षण संस्थे कडून जुनोना येथील वनविकास महामंडळाला न कळविता फेकण्यात आल्या होत्या, आणि ह्या वेळी सुद्धा न विचारता जवळपास ११ गाई फेकण्यात आल्या आहे.

जुनोना जंगलात तलाव परिसरात हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी चे पिंटू उईके कृपाल नाकाडे गेले असता खूप दुर्गंधी पसरली असल्याचे लक्षात आले, नेहमी रेल्वे नि अपघातात मेलेल्या जनावरांचे नेहमी सांगाडे येथे पडले असतात, पण ह्या वेळी प्रकरण वेगळेच आढळले, कारण ज्या गाई तलाव परिसरात आढळल्या त्यांचे पाय बांधल्या अवस्थेत दिसले, म्हणजे ते रेल्वे अपघातात मेलेले नसल्याचे निष्पन्न झाले, तलाव परिसरात एकूण ११ गाई फेकल्याने वाघ सुद्धा आकर्षित आल. व त्याचा रात्री घेतलेला विडिओ सुद्धा सोशल मेडिया वर वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली, हा विडिओ कुणी घेतला अजून काही सजले नाही. समजा कुठलेली जनावर मेलेले असल्यास वनविभागाचे त्याच्यावर लक्ष असते कॅमेरा सुद्धा लावण्यात येते, पण ह्या गाईन बद्दल FDCM ला कुठलीच कल्पना नसल्याने त्या गाई विषबाधा झाली असती तर मोठा घात झाला असता, जुनोना परिसरात कुठल्याच प्रकारची FDCM कडून गस्ती होत नसल्याने त्या परिसरात रात्री सुद्धा चारचाकी घेऊन टॉर्च घेऊन फिरायला अनेक लोकांची गर्दी होत अतिशय जास्ती प्रमाणात सुरु आहे,

लोहारा कडून जुनोना कडे जात्ताना एका संस्थेकडून गेट बसण्यात आले होते, काही दिवस वनमजूर सुद्धा ठेवण्यात आले, पण नंतर जैसे थे, जुनोना परिसर हा नेहमीच वन्यप्राण्यांची ये जा असते, काही महिन्यापूर्वीच ३ वाघांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, म्हणून ह्या परिसराकडे FDCM ने लक्ष देणे गरजेचे आहे, व गोरक्षण संस्थे वर FDCM काय कारवाई करण्यात येते ह्याकडे सर्व वन्यप्रेमींचे लक्ष लागून आहे.
हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी चे पप्पी यादव, महेंद्र मांढरे, अवि काकडे, चंदू पिंपळकर संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्यास उपस्थित होते .