रस्त्यावरील बांधकाम धुळीमुळे अपघातात वाढ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०१९

रस्त्यावरील बांधकाम धुळीमुळे अपघातात वाढ

छावा संग्राम संघटनेतर्फे रस्त्यांवरील विविध समस्यांबाबत अडयाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

भंडारा /प्रतिनिधी

नॅशनल हायवे भंडारा - अडयाळ - पवनी दरम्यान सुरू असलेल्या रोडच्या बांधकामा दरम्यान उडत असलेली धुळीमुळे अपघात मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व यावर संबोधित ठेकेदारांकडून नजरअंदाज केली जात आहे.

अश्या अनदेखा कामामुळे भविष्यात या रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावे रोडवर वेळोवेळी टॅंकर ने पाणी मारण्यात यावे कामासंबंधी रस्त्यांवर खोल खड्डे केले आहेत त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावेत या बाबात आज अडयाळ पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक श्री ढोबळे सर यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी डोबळे सरांनी लगेच कंपनीतील वरिष्ठ कर्मचारी यांना बोलावून निवेदनाद्वारे कळविण्यात आलेले मुद्दांबद्दल सांगुन कंपनीला व कर्मचारींना नोटीस बजावली.

भविष्यात जर एखादी घटना घडल्यास गुन्हा दाखल करुन आरोपी बनविण्यात येणार असे बजावून सांगितले व 149 कलम अंतर्गत नोटीस बजावली.

यावेळी छावा संग्राम चे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, बाळु ठवकर, शिवा गायधने, मुनीर शेख, विनोद गायधने, राहुल खोब्रागडे, विनोद गंधे, चिंतामन वाघमारे, विक्की पचारे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.