सावकारी बळीप्रकरणी हत्येचा गुन्हाच नाही - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०१९

सावकारी बळीप्रकरणी हत्येचा गुन्हाच नाही  • कल्पना हरिणखेडेचा उपचारादरम्यान मृत्यू
  • किशोर जोरगेवार उपविभागीय पोलिस अधिका-यावर संतापले
चंद्रपूर- व्याजाने घेतलेल्या पैश्याच्या वादातून अवैध सावकाराने माय लेकांना जिवंत जाळल्याची संतापजनक घटणा चंद्रपूरात घडली होती. या मायलेकावर नागपूर येथे उपचार सुरु होता. मात्र आज कल्पना हरिणखेडे यांचा उपचारा दरम्याण मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या मृत्युला दहा तासांपेक्षा अधिक काळ झाला असला तरी या प्रकरणातील आरोपीवर कलम 302 अंतर्गत हत्तेचा गुन्हा दाखल न करण्यात आल्याने यंग चांदा ब्रिगेडेचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार हे उपविभागीय पोलिस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्यावर चांगलेच संतापले. विषेश म्हणजे स्वता पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले असतांनाही पोलिस प्रशासण आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करत आहे. असा आरोप किशोर जोरगेवार यांनी केला असून हे खपवून घेतल्या जाणार नाही असा ईशारा दिला आहे.
व्याजाच्या पैश्यातून झालेल्या वादातून अैवध सावकाराने मायलेकावर पेट्रोलचा शिरकाव करुन जिवंत जाळल्याची घटणा चंद्रपूरातील सरकार नगर येथे घडली होती. या घटणेनंतर चंद्रपूरात चांगलाच रोष निर्माण झाला. याची दखल घेत पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सुरुवाती पासुनच या प्रकरणात पोलिस प्रशासणाची भुमीका संशयास्पद दिसून आली. घटने नंतर तात्काळ आरोपीला अटक करुन त्याचा शासकीय रुग्णालयात उपचार करणे गरजेचे होते. मात्र तसे होतांना दिसले नाही. पिडीतांवर शासकीय रुग्णालयात उपचार सूरु असतांना आरोपी मात्र नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. असा खुलासा किशोर जोरगेवार यांनी केला आहे. तसेच उपचारा दरम्याण आज कल्पना हरिणखेडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू नंतर आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करणे अपेक्षीत होते. मात्र घटणेला दहा तास झाले असले तरी पोलिस प्रशासणाने आरोपी जसबीरसिंग उर्फ सोनू भाटीयावर हत्तेचा गुन्हा दाखल केलेला नाही. हे कळताच किशोर जोरगेवार पोलिस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेदकर यांच्यावर चांगलेच संतापले. तसेच या प्रकरणी थातूर मातूर कारवाही करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. असा ईशारा देत आरोपीवर तात्काळ हत्तेचा गुन्हा दाखल करा अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.