कॅस्ट्रॉल इंडियाकडून झीच्या भागीदारीत कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिकच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०१९

कॅस्ट्रॉल इंडियाकडून झीच्या भागीदारीत कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिकच्या तिसऱ्या आवृत्तीची घोषणा
कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक भारतभरातील एक लाखापेक्षा अधिक मेकॅनिक्सची तपासणी करणार 
भारतातील २० शहरांमधील सुमारे ५००० मेकॅनिक्ससाठी अध्ययन सत्रे आयोजित करणार

मुंबई,८ मे २०१९ – कॅस्ट्रॉल या भारताच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय लुब्रिकंट कंपनीने आपल्या अत्यंत यशस्वी आणि बहुप्रतीक्षित 'कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक काँटेस्ट' या भारताच्या सर्वांत मोठ्या मेकॅनिक टेस्टिंग आणि प्रशिक्षण उपक्रमाचे अनावरण केले आहे. या कार्यक्रमातून भारतभरातील कार आणि बाइक मेकॅनिक्सना आपली कौशल्ये तपासून आपले ज्ञान तसेच बुद्धिमत्ता यांच्या माध्यमातून ओळख मिळवण्याची संधी देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमामध्‍ये २०१८ साली एक लाखापेक्षा अधिक मेकॅनिक्सनी सहभाग घेतला. त्याला कॉम्प्युटराइज्ड इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स राऊंड (आयव्हीआर)ने सुरूवात झाली. हा राऊंड प्रत्येक कार आणि बाइकच्या वर्गात ४० मेकॅनिक्सची निवड करेल. मुंबईतील अंतिम फेरीत प्रत्येक वर्गातील सर्वोच्च दहा मेकॅनिक्स राष्ट्रीय टीव्हीवर सर्वोच्च स्लॉटसाठी प्रयत्न करतील आणि अशा आव्हानांचा सामना करतील, जी त्यांचे लेखी व प्रात्यक्षिक ज्ञान तपासेल.

यावर्षी एक पाऊल पुढे जाताना कॅस्ट्रॉल इंडियाकडून ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी)कडून मान्यताप्राप्त अध्ययन सत्रे २० शहरांमधील सुमारे ५००० मेकॅनिक्ससाठी आयोजित केली जातील आणि ज्या शहरांमध्ये त्याचे आयोजन होणार आहे, त्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट केली जाईल. व्याप्ती वाढवण्यासाठी आणि या उपक्रमाचा प्रतिसाद वाढवण्यासाठी कॅस्ट्रॉल इंडियाने झी मीडिया कॉर्पोरेशनसोबत ती अस्तित्वात आणण्यासाठी तसेच तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे, त्यामुळे ती आजपर्यंतची सर्वांत मोठी कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक स्पर्धा ठरणार आहे.

मेकॅनिक समाजाचे यश आणि विकासाबाबत प्रयत्नशील असलेले ओमर डोरमन, व्यवस्थापकीय संचालक, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड म्हणाले की, ''कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक प्रोग्राम कॅस्ट्रॉल इंडियाच्या मेकॅनिक समाजाची कौशल्ये वाढवण्याच्या कटिबद्धतेला चालना देतो आणि त्यांची बुद्धिमत्ता तसेच समाजातील योगदानाला सार्वजनिक व्यासपीठाद्वारे ओळख देतो. या मेकॅनिक्सच्या रुपांतरणाला मदत करणे खूप आनंददायी व उत्साहवर्धक आहे, कारण ते भारताला पुढे जाण्यास मदत करतात.'' ते पुढे म्हणाले की, “आम्हाला आशा वाटते की, हा कार्यक्रम आणि कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक स्पर्धेचे माजी विजेते यावर्षी इतर अनेकांना आपली यशोगाथा लिहिण्यास मदत करतील.''

झी मीडिया कॉर्पोरेशन झीच्या विविध वाहिन्यांवर कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक प्रोग्रामचे विविध कार्यक्रम दाखवेल आणि अनेक मेकॅनिक्सना राष्ट्रीय टीव्हीवर येण्याची संधी देईल. या निमित्ताने बोलताना आशिष सहगल, मुख्य विकास अधिकारी, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइझेस म्हणाले की, ''आमच्या प्रेक्षकांसाठी मेकॅनिक्सच्या कथा प्रत्यक्षात आणणे हे भारतीय टीव्हीवर काहीतरी वेगळे आहे. झीच्या सामान्य लोकांना हिरोच्या रूपात लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्नांमुळे कॅस्ट्रॉल इंडियासोबत या प्रकल्पासाठी भागीदारी करताना आणि त्यांच्या व्यवसायाला प्रतिष्ठा देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.''

हा कार्यक्रम दिल्ली येथे आयोजित दिमाखदार रेड कार्पेट सोहळ्यात सुपर मेकॅनिक्सच्या विजेत्यांची घोषणा केल्यावर संपेल. तो झी अनमोलवर जुलै २०१९ पासून दाखवण्यात येईल. हा शो झी न्यूजसह झीच्या विविध नेटवर्क वाहिन्यांवरही दाखवला जाईल.

आपल्या सुंदर प्रवासाबद्दल बोलताना सुपर मेकॅनिक रविश सिद्देगौडा, कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक २०१८चे विजेते म्हणाले की, ''कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिकने माझे आयुष्य पालटले. राष्ट्रीय टीव्हीवर आल्यामुळे मला सामाजिक प्रतिष्ठा मिळाली. माझा व्यवसाय वाढला आहे आणि आज माझ्यासोबत काम करणारी एक टीम आहे. शहरातील लोकांना आपली वाहने माझ्या गॅरेजमध्ये तपासून आणि दुरूस्त करून हवी असतात. कॅस्ट्रॉल सुपर मॅकेनिक होणे हा माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा क्षण होता!''

सहभागी होण्यासाठी:

सहभागी होण्यासाठी अर्जदार 1800-120-1401 डायल करून पुढील सूचनांचे पालन करू शकतात.

मेकॅनिक लर्निंग सेशन्सबाबत तारखा आणि नोंदणी लवकरच घोषित होईल. मेकॅनिक्सना एसएमएसद्वारे सूचित केले जाईल आणि येथे भेट देता येईल- www.castrol.co.in