चंद्रपुरात संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०१९

चंद्रपुरात संशयास्पद स्थितीत आढळला युवकाचा मृतदेह

हत्या कि आत्महत्या याचा तपास सुरु 
चंद्रपूर/प्रतिनिधी:


चंद्रपुरातील बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर परिसरात शनिवारी सकाळी एका २५ वर्षीय युवकाचा मृतदेह झाडावर लटकला दिसला,या घटनेमुळे परीसात चांगलीच खळबळ माजली.सुभाष नामदेव लोहकरे असे मृत युवकाचे नाव आहे.काल रात्री २ वाजताच्या सुमारास त्याने परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असे बोलल्या जात आहे मात्र हि हत्या कि आत्महत्या याचा तपास चंद्रपूर पोलीस करीत आहेत.या मृतदेहाकडे बघितल्या नंतर अनेक संशय व्यक्त केले जात आहे.त्यामुळे हि हत्या होती कि आत्महत्या हे समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.तसेच शव शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.
पोल्ट्रीफीड आणि कॅटेल फीड उपलब्ध