तांत्रिक कर्मचाऱ्यांचा महावितरणकडून गौरव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

तांत्रिक कर्मचाऱ्यांचा महावितरणकडून गौरव

नागपूर/प्रतिनिधी:

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महावितरणच्या ४७ तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामगार दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले.

महावितरणच्या काटोल रोडवरील कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक आणि मुख्य अभियंता दिलीप घुगल होते.

वीज क्षेत्रात काम करीत असताना सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सुरक्षित उपाययोजना करून काम करावे, असे आवाहन मुख्य अभियंता घुगल यांनी केले. मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) सुहास रंगारी यांनी देखील उपस्थित तांत्रिक कर्मचाऱ्यांना संबोधित केले.

यावेळी वर्धा मंडल कार्यालयातील १६,नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयातील २२ आणि शहर मंडल कार्यालयातील १० यंत्र चालक आणि तंत्रज्ञ यांचा प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला.

सुशांत श्रुंगारपुरे आणि अब्दुल सादीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार,अधिक्षक अभियंता नारायण आमझरे, दिलीप दोडके, बंडू वासनिक, कार्यकारी अभियंता कुंदन भिसे,दिपाली माडेलवार,संजय वाकडे, प्रज्वला किन्नाके,विनोद सोनकुसरे,सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)वैभव थोरात, प्रणाली विष्लेशक प्रविण काटोले,उप व्यवस्थापक (वित्त व लेखा) अतुल राऊत,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.