नागपुरात पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०१९

नागपुरात पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरची पायपीट

पाणी प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अपयश :ग्रामस्थ तीव्र संताप
चांपा/प्रतिनिधी:
उमरेड तालुक्यातील सूरगाव ग्रामपंचायत अंतर्गत कुही फाटा  बिरसानगर येथील अतिदुर्गम आदीवासी खेडेगाव बिरसा नगर येथे पाणी टंचाईमुळे 45 डिग्री सेल्सियसच्या तापमानात  महिलांना डोक्यावर हांडे घेऊन पिण्याचे पाणी भरण्यासाठी तीन की .मी पर्यंत भटकंती करावी लागते .गेल्या अनेक वर्षांपासून या गावचा पाणी प्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही .त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी त्वरीत शासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा , अशी मागणी येथील महिलांनी केली .

उमरेड तालुक्यात दर वर्षी जाणवणाऱ्या उष्म्याबरोबरच पाणी टंचाईमुळे विहिरीनी तळ गाठला आहे.पाणी टंचाईग्रस्त गावे व पाड्यामध्ये लहान मुलांसह आचल वृध्दाचेही पाण्यासाठी हाल होत आहेत .पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याची चिन्हे असून , सध्या बिरसानगर कुही फाटा , चांपा , सुकळी , हळदगाव , मांगली , खापरी , तिखाडी , परसोडी , सूरगाव, उटी  इत्यादी परिसरातील विहिरीनी तळ गाठल्याने इत्यादी गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली  आहेत .सूरगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बिरसानगर कुही फाटा येथील जनतेला दोन महिन्यापासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे .त्यामुळे येथे त्वरीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा , अशी मागणी ग्रामस्थांनी केली बिरसा नगर कुही फाटा गाव उंचावर असल्याने या गावाला दर वर्षी जानेवारी पासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते .या गावास पाणी पुरवठा करण्यासाठी गावाजवळच एक विहीर आहे .पावसाळ्यात साठा झालेले या विहीरीतील पाणी साधारण डिसेंबर अखेर पुरते .मात्र त्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागतो

 .गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर नागपुर ते उमरेड महामार्गाच्या कडेला असलेल्या शेतातमधील   विहीरीत पहाटे पासूनच पिण्याचे पाण्यासाठी महिलांच्या रांगा लागतात .महिलांना जीव मुठीत घेऊन तीन किलोमीटरची पायपीट करून पिण्यासाठी एक गुंड पाणी आणावे लागते . जिल्हापरिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायतने दुर्लक्षच केल्यामुळे येथील जनतेला नाहक त्रास सोसावा लागतो .करीता शासनाने तत्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी  सुगंधा गुजर , इंदूबाई महापुरे , आशाबाई गुजर , संजय महापूरे इत्यादीनी केली आहेत .