गावं पाणीदार करण्याकरिता बांगडापुरात महाश्रमदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०१९

गावं पाणीदार करण्याकरिता बांगडापुरात महाश्रमदान

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे)

वॉटर कप २०१९ पर्व ४ पाणी फाउंडेशन चा दुष्काळ मुक्त महाराष्ट्र चा चळवळीत या वर्षी बांगडापुर गावानी आपला सहभाग नोंदवीला व प्रशिक्षण घेऊन गावात आल्यावर त्यांनी आपल्या गावाला दुष्काळ मुक्त करण्याचे प्रयत्न सुरु केले.

त्यानी आपल्या प्रयत्नातुन स्पर्धे पुर्वीचे ३० मार्काचे काम हे पुर्ण केले व ७ एप्रिल ला ठिक मध्य रात्री १२:१ सेकंद ला आपल गाव पाणीदार करण्या साठी श्रमदानाला सुरवात केली व जवळपास संपुर्ण वागाचा ऐकोप्याने बांगडापुर गावाने तालुक्याचे श्रमदानाचे टार्गेट पुर्ण केले व याच अणुशंघाने बांगडापुर गावाने १ मे महाराष्ट्र दिना निमीत्य गावात गावकऱ्याचा मदतीने महाश्रमदानाचे आयोजन केले.

हे महाश्रमदान गावातील मतभेद दुर करुन ऐकीचे बळ दाखवनारे श्रमदान ठरले या महाश्रमदानाला कारंजा तालुक्यातील स्वयमसेवक बांगडापुर गावात १ मे चा पहिल्या रात्रीच पोचले गावाचा उत्साह वाढवण्या साठी,गावाचे वातावरण अस दिसत होत कि जणु गावात ऐखादा उत्सवच संपुर्ण गाव व स्वयम सेवक १ मे ची जल्लोश चय्यारी करयाला लागले..

 १ मे चा दिवस उजळला गावातील महिला पुरुष छोटी मुले वृद्ध युवक स्वयम सेवक प्रशिक्षणार्थींनी गावात येणाऱ्या पाहुण्याच्या स्वागता साठी सज्ज झाले गावात उत्सवाचे वातावरण निर्मान झाले..

 सकाळी ठिक ६ ला मुंबई वरुन जल मीत्र दिपक ढोले थेट बांगडापुर गावी पोचले बांगडापुर पाणीदार करण्या साठी त्याच नंतर नागपुर चे जल मीत्र महेश कापसे,खंडागडे सर हे देखील पोचले व जिव्हाळा सेवाभावी संस्था,उमेद अभीयान,संवेदना युवा मंच,नेहरु युवा केंद्र,अनुलोम विलोम,मॉडेल कॉलेज तहसील वॉफीस, कृषी वॉफीस व फॉरेस्ट चे आर एफ ओ राऊत साहेब व त्यांची संपुर्ण ठिम या दुष्काळ मुक्त चळवळीचे साक्षी व्हायला बांगडापुर येथे पोचले या लोक चळवळी मुळे गाव प्रशासन सामाजीक संस्था जल मीत्र व सर्व एक होऊन ४५ डिग्री चा कडकडत्या उनात या सर्वांनी आपला खारीचा वाटा दिला व जल मीत्र महेश कापसे यांनी मशीन कामा साठी १००० रु ची आर्थीक मदत देखील बांगडापुर गावाला केली...

आज बांगडापुर पुण्हाहुन त्याच जोशाने श्रमदान करतय पण त्यांचे आर्थीक पाठबळ कमी पडत आहे त्यांना सामोरचा कामा  साठी मशीन ची गरज आहे पण गाव मजुर वर्गाचे असल्या कारणाने हे शक्य होत नाहि आहे म्हणुन आपल्या सर्वांना विनंती आहे कि आपण सर्वांनी मिळुन बांगडापुर गावाची मदत करावी..