जागतिक मातृ दिनानिमित्त संगीतमय कार्यक्रम रविवारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

जागतिक मातृ दिनानिमित्त संगीतमय कार्यक्रम रविवारी


नागपूर महानगरपालिकेचे आयोजन
नागपूर,ता. ९ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व हार्ट बिट्स इव्हेंटचे संचालक प्रशांत सहारे, संजीवनी बुटी आणि आई कुसुमताई सहारे फाउंडेशनचे संस्थापक मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या सहकार्याने जागतिक मातृ दिनानिमित्त रविवारी (ता.१२) ‘माँ’ या मराठी व हिंदी गीतांच्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल.

कार्यक्रमात प्रशांत सहारे, संजीवनी बुटी, प्रशांत वालीओकर, नितीन झाडे, प्रतिक जैन, योगेश आसरे, प्राची सहारे, अनुष्का काळे, सुनीता कांबळे, सावी अनिल तेलंग आदी गायक कलावंत गीत सादर करणार आहेत.

कार्यक्रमासाठी प्रवेश नि:शुल्क आहे. कार्यक्रमाला माय एफ.एम. (९४.३), एस.जे.ए.एन., व्हीजन ॲकेडमीचे सहकार्य लाभले आहे. प्रशांत नागमोते व नम्रता अग्नीहोत्री हे कार्यक्रमाचे उद्घोषक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यक्रमाला संगीत रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.