ग्राहक जागृतीतजनसंपर्क विभागआणि माध्यमांचीभूमिका महत्वपूर्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०१९

ग्राहक जागृतीतजनसंपर्क विभागआणि माध्यमांचीभूमिका महत्वपूर्ण

महावितरणचे मुख्य जनसंपर्क 
अधिकारी पाटील यांचे मत
नागपूर/प्रतिनिधी:

 प्रशिक्षणात सहभागी झालेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यांसमवेत मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस.पाटील, कार्यकारी अभियंता अनिल नागरे, देवेंद्र सायनेकर,समन्वयक सुषमा सावरकर आदी.

जगभरात वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्येमहावितरण ही क्रमांक दोनची सर्वात मोठी कंपनी आहे.राज्यातील जवळपास अडीच कोटींपेक्षा अधिक वीजग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महावितरणसातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवीत आहे. यासुविधांबाबत ग्राहकांमध्ये जागृती घडवून सकारात्मकप्रतिसाद मिळविण्यात महावितरणचा जनसंपर्क विभाग आणिप्रसार माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण ठरत असल्याचे मतमुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी व्यक्त केले.महावितरणच्या जनसंपर्क विभागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठीनाशिकस्थित व नव्याने स्थापन झालेल्या वीज व्यवस्थापन वप्रशिक्षण संस्थेत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षणशिबिराच्या समारोप प्रसंगी पाटील बोलत होते. प्रशिक्षणकेंद्रातील कार्यकारी अभियंता अनिल नागरे, देवेंद्र सायनेकर,समन्वयक सुषमा सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीयसंचालक संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक वकर्मचाऱयांसाठी मोबाईल अँप (APP), वेब पोर्टलच्यामाध्यमातून सर्व सेवा घरबसल्या व ऑनलाइन, अंतर्गतसंगणकीकरण, डॅशबोर्ड आदींच्या माध्यमातून कामातसुलभता, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची यशस्वीअंमलबजावणी आदी कामे प्रभावीपणे पूर्ण झाली आहेत.कंपनी व्यवस्थापन आणि ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून कामकरणाऱ्या जनसंपर्क विभागासाठी प्रसारमाध्यम हे संवादाचेप्रभावी साधन आहे. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा,माध्यमांमधील नवीन बदल, प्रवाह याबाबत सजग राहूनजनसंपर्क विभाग आवश्यक त्या बदलासह ग्राहकसेवेत सज्जआहे. हा विभाग अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठीव्यवस्थापनही सकारात्मक आहे, असे पाटील म्हणाले.

प्रशिक्षणात सहमुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे,उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, योगेश विटणकर,सुनील जाधव, जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरीकर,निशिकांत राऊत, धनंजय पवार, मोहन दिवटे, विकास पुरी,विकास आढे, आनंद कुमरे, फुलसिंग राठोड, ज्ञानेश्वर आर्दड,किशोर खोबरे, विश्वजित भोसले, विजयसिंह दुधभाते  सहभागी होते